लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. लता मंगेशकर पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.